Pune : संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले हवामान विभागाला टाळे

एमपीसी न्यूज – मराठवाड्यातील भीषण दुष्काळास हवामान खात्याचे चुकीचे अंदाज जबाबदार असल्याचा आरोप करत माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हवामान खात्याला टाळे ठोकण्यात आले. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हवामान खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

हवामान खात्याने मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. परंतु मराठवाड्यात पाऊस न झाल्याने पिक करपली त्यामुळे करोडो रुपये हवामान खात्यावर खर्च करण्यापेक्षा हे खाते बंद करा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. हातात करपलेली पिक घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.