Pune : समेध शिखरजीच्या सरंक्षणार्थ हजारो जैन बांधव रस्त्यावर

पर्यटनाचा निर्णय रद्द करण्यासाठी झारखंड सरकारच्या विरोधात जैन समाजाचा पुण्यात मूकमोर्चा

एमपीसी न्यूज – झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणार्थ आज पुणे येथे जैन समाजाच्या वतीने विशाल मुकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पुण्यातील जैन बांधव मोठ्या सहभागी झाले होते. या मोर्च्यात हजारो जैन बांधव सहभागी झाले होते. झारखंड सरकारने सेध शिखरजीवर होणारे पर्यटन रद्द करावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
मूकमोर्चामध्ये आचार्य युगभूषण सुरीजी पुलकसागरजी म.सा.अॅड. एस के जैन, अचल जैन, मिलिंद फडे, फत्तेचंद रांका, शर्मिला ओसवाल, अभय छाजेड, बाळासाहेब ओसवाल, राजेंद्र बाठिया, शरद शहा, नितीन जैन, दिलीप मेहता, राजेश घीवाला, जितेंद्र दोषी, रमेश राठोड, राजु ओसवाल, भारत सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.
_MPC_DIR_MPU_II
झारखंड सरकारने समेध शिखरजी येथे पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने त्याठिकाणी मांस, मटन दारु, रेस्टॉरंट सुरु होत आहेत. समेध शिखरजी येथे जैन धर्माच्या 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण झाले आहे. या तीर्थक्षेत्रावर हेलिपॅड बनविण्यात आले आहे. ते हेलिपॅड पर्यटनक्षेत्रासाठी तयार करण्यात आले असेल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि जर ते संरक्षणार्थ असेल तर त्याला आमचा विरोध नाही. पर्यटनाच्या निर्णयामुळे या पवित्र स्थानाचे पावित्र्य धोक्यात आल्याने जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विशाल मूकमोर्चा काढण्यात आला आहे. असेही जैन बांधवांकडून सांगण्यात आले.
यावेळी जैन समाजाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्च्यात तरुणाईही मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.