Charholi News : किड्स पॅराडाईज इंटरनॅशनल शाळेत क्रीडा दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : चऱ्होलीतील,काळे कॉलनीतील किड पॅराडाईज इंटरनॅशनल शाळेत,एम.आय.टी कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब वाफारे यांच्या उपस्थितीत क्रीडां दिनाचे (Charholi News) आयोजन करण्यात आले होते .यावेळी शाळेचे अध्यक्ष अँड अनंत काळे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केला. यामध्ये धावणे,अंडर चेअर ,बॉल बॅलन्स ,कलर मॅचिंग, स्वर मॅचींग, चॉकलेट गेम ,क्लीन इंडिया ,खो खो अशा विविध प्रकारच्या खेळाची आयोजन करण्यात आले होते, यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.

यावेळी शाळेचे अध्यक्ष अँड आनंत काळे म्हणाले की मुलांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ पण खेळला पाहिजे यासाठी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील.

Pune News : राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी – मुख्यमंत्री

एमआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉ  बाळासाहेब वाफारे म्हणाले की पालकांनी पण मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या अंगातील सुप्त गुणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे .

यावेळी क्रीडा शिक्षक प्रशांत हराळ, संदेश साकोरे, प्रणव सकुंड, उपस्थित होते तसेच शाळेचे अध्यक्ष अँड आनंत काळे उपाध्यक्ष कुंदा काळे ,संचालक नवनाथ काळे, (Charholi News) आणि नगरसेवक अँड सचिन काळे ,मा नगरसेवक दिनेश घुले, मिथील पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका व प्राचार्य स्वाती काळे, संगीता सूर्यवंशी इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होता ,तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहून मुलांच्या कलागुणांचे कौतुक सोहळा पाहत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.