Pune News : ग्लोबल संस्थेच्या राजदूत (Ambassador) म्हणून रिता शेटीया यांची नियुक्ती 

एमपीसी न्यूज : सिंगापूर मधील ग्रेस लेडीज ही आंतरराष्ट्रीय संस्था महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करते. या संस्थेने नुकतेच रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थपिका रिता शेटीया यांना भारतातील पुण्यासाठी ग्रेस लेडीज संस्थेची राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. 

ग्रेस लेडीज चे हे कार्य त्यांना भारतातील पुणे जे विद्येचे माहेर घर आहे येथेही करायचे आहे. रिता शेटीया या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने ग्रेस लेडीज च्या सांस्थपिका सोना पांडे यांनी त्यांची निवड ग्रेस लेडीज च्या भारतातील पुणेसाठी राजदूत म्हणून केली आहे. सोना पांडे म्हणाल्या , मला विश्वास आहे की ग्रेस लेडीज चे कार्य रिता पुण्यात नक्कीच पुढे नेतील आणि पुण्यातील महिलाना ग्रेस लेडीज च्या अंतर्गत ग्लोबल स्तरावर एक नवीन ओळख निर्माण करून देतील.

रिता शेटीया म्हणाल्या की, ग्रेस लेडीज ही संस्था ग्लोबल स्तरावर महिलाना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यशाळा, ग्लोबल एक्सपोजर, महिलाना आत्मनिर्भर बनवणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि महिलांना अंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्याचे काम करते. त्यांच्या ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड या अंतर्गत ही महिलाना चांगली संधी मिळते.

नुकताच या संस्थेकडून रिता यांना यावर्षीचा ‘ ग्लोबल वूमन आयकॉन अवॉर्ड 2022 ‘ हा पुरस्कार ऑनलाईन देण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त यंदा जागतिक स्तरावर पहिल्यांदाच प्रत्येक पुरस्कार प्राप्त महिलांचे व्हिडिओ घेऊन जागतिक स्थरावर वर ते प्रसिद्ध करणारी ग्रेस लेडीज ही पहिली संस्था. या वर्षी विविध देशातून आलेल्या एकूण 400 अर्जातून 60 अर्ज विविध पुरस्कारासाठी निवडण्यात आले. त्यामध्ये रिता यांची या पुरस्कारासाठी निवड झाली . नुकतीच या पुरस्काराची ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड – ऑफ लाँगेस्ट व्हिडिओ मध्ये नोंद घेण्यात आली आहे.

ज्या महिलाना या संस्थेशी संपर्क करायचा असेल किंवा संस्थेतील विविध कार्यशाळेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी रिता शेटीया (9271213541) यांच्याशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.