Maval News : मावळातील दलित वस्त्यांमधील रस्ते व समाज मंदिरांसाठी एक कोटी रुपयांच्या निधीस मान्यता

एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन 2021-22 अंतर्गत मावळ तालुक्यातील विविध गावांतील दलितवस्त्यांवरील रस्ते व समाज मंदिरांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या कामांसाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मावळातील अहिरवडे येथील भिमनगर मधील केरू साळवे यांच्या घरापासून ते दिलीप साळवे घरापर्यंत रस्ता करण्यासाठी 10 लक्ष रुपये, नाणे येथील दलितवस्ती अंतर्गत रस्ता करण्यासाठी 10 लक्ष रुपये, देवले येथे पाण्याची टाकी ते दलितवस्तीपर्यंत रस्ता करण्यासाठी 10 लक्ष रुपयांची मान्यता मिळाली आहे.

तसेच, निळशी येथील समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये, कुसवली येथे समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये, देवघर येथे समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये, भाजे येथे समाजमंदिर पत्राशेड बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये, अजिवली येथे बौद्धविहार समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये, माळेगाव अंतर्गत पिंपरी येथे समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये व पाटण येथे समाजमंदिर बांधण्यासाठी 10 लक्ष रुपये अशा एकूण 10 कामांसाठी सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता प्राप्त झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.