Talegaon Dabhade : लवकरात लवकर शेतकऱ्यांची ऊस तोड व्हावी अन्यथा भाजपकडून आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत. मात्र अद्यापही ऊस तोडणी यंत्रणा पोहोचली नसल्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तक्रार असून लवकरात लवकर शेतकऱ्यांची ऊस तोड व्हावी अन्यथा आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाकडून देण्यात आला आहे.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत, तरीही बऱ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड झालेली नाही. यावर्षी पाऊसकाळा उशिरा झाल्यामुळे बरेच क्षेत्रातील उसाला तुरे व बरेचसे वजन घटले आहे. त्यामुळे कारखानाही उशिरा सुरू झाला. सबब ऊस तोडणी तातडीने करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

सोमवार दि.३० रोजी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी भाजपा अध्यक्ष रवींद्र (आप्पा) भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती एकनाथ टिळे, सुभाष धामणकर,जालिंदर धामणकर, सुनील चव्हाण,विश्वनाथ जाधव,शामराव राक्षे,शिवाजी लोहार,दिलीप विधाते, रोहिदास धामणकर,शिवाजी धामणकर, बाळासाहेब धामणकर,सूर्यकांत सोरटे, यादव सोरटे, दशरथ शिर्के.

रविआप्पा भेगडे, ज्ञानेश्वर दळवी, शामराव राक्षे, सूर्यकांत सोरटे,यादव सोरटे, बाळासाहेब जाधव, सुभाष धामणकर, जालिंदर धामणकर, दिलीप विधाटे, शिवाजी लोहर, रोहिदास धामणकर व इतर मान्यवरांच्या वतीने श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक दुर्वे साहेब व साहेबराव पठारे यांना, लवकरात लवकर मावळ व मुळशी भागातील ऊस तोडणी सुरू करावी व उत्तम प्रकारे ऊसतोडणीचे नियोजन दरवर्षी करावे, असे निवेदन देण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.