Pimpri : मावळ्यांनी काढलेल्या शिवछत्रपतींच्या पायी पालखीचे पिंपरीत आगमन   

एमपीसी  न्यूज –   रणरणत्या उन्हात पैलवान अनिकेत घुले आयोजित श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा किल्ले शिवेनरी ते किल्ले रायगडचे दापोडी येथे आगमन झाले.

छत्रपतींच्या मूर्तीची शिवभक्तानी शिव आरती केली. यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत छत्रपतीची मूर्ती विराजमान झाली. तेथून ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या नामघोषात कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. शिवभक्तांच्या जयघोषात पालखी पुढे मार्गस्थ झाली.

यावेळी पिंपरी विधानसभेच्या युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक  निलेश हाके  यांनी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिवभक्तांना न्याहरी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाम लांडे, कुणाल जणगाडे, अजित बोराडे, मनोज वाखारे, मयूर पुंडे, हेमंत फुगे, सनी कड, ओंकार जगदाळे, रवी नगरकर,  नितीन वाघमारे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.