Pimpri : कार खरेदी करारनामा करूनही कार न देता तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – कार खरेदी केल्याचा करारनामा केला. त्यासाठी तरुणाकडून 52 हजार रुपये घेतले. मात्र, कार न देता तरुणाची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.

निलेश जालिंदर बिले (वय 24, रा. मोहननगर, चिंचवड) या तरुणाने या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाबुराव मन्मज्ञ विराळे (वय 26, रा. कोरेगाव भीमा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव याच्याकडे वॅगन आर (एमएच 02 / ईएच 1330) कार आहे. ती कार विकण्याच्या बहाण्याने नऊ जानेवारी ते 9 एप्रिल 2018 या कालावधीत बाबुराव याने निलेश याच्याकडून दोन हजार रुपये ॲडव्हान्स तर 50 हजार रुपये रक्कम घेतली. तसेच मोरवाडी न्यायालयात वाहन खरेदीचा रितसर करारनामा केला. मात्र निलेश याला कारण न देता त्याची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.