Ashadhi Ekadashi Mahapooja: मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

विठ्ठलनामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमले

एमपीसी न्यूज: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या उपस्थित होत्या.(Ashadhi Ekadashi Mahapooja) ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शासकीय महापूजा केली. विठुरायाच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले. (Ashadhi Ekadashi Mahapooja) शिंदे यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शासकीय विश्रामगृहातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि शासकीय महापूजा पार पडली.

Ashadi Vari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ चा समारोप

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सर्व मानाच्या संताच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या तर मुख्यमंञी राञी उशिरा पंढरीत दाखल झाले.  आज मोठ्या उत्साहात आषढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगणार आहे.

CM Eknath Shinde : राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.