Pimpri : सांगवडे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक गणपती

एमपीसी न्यूज – सांगवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपती साकारले. 

सांगवडे गावातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि. 26) इकोफ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. वनस्थळी संस्था सोमटणे यांच्यातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. मृणालिनी पाटील यांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

शाडू मातीपासून गणपती बनविण्याचा आनंद पर्यावरण संवर्धन समितीच्या मुलांनी घेतला तसेच पर्यावरणाचे महत्व समजून घेतले. यावेळी वनस्थळी संस्थेच्या व्यवस्थापक गुणाकी मुख्याध्यापक श्रीधर उतेकर, संदीप सकपाळ, अण्णासाहेब ओहोळ, उर्मिला शिरसाट आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सांगवडे गावातील ग्रामस्थांनी देखील लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.