Aundh : दिवाळी दसरा इतकाच शिवराज्याभिषेक दिन आपल्यासाठी महत्त्वाचा : प्रविण तरडे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सनी निम्हण यांच्या वतीने सिने अभिनेता प्रविण तरडे(Pravin Tarde) यांचा सरसेनापती हंबीरराव मोहिते (Sarsenapati Hambirrao Mohite) या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. या वेळी सिने अभिनेते प्रविण तरडे आणि मुळशी पॅटर्न (Mulshi pattern) फेम पिट्या भाई आणि निर्माते सौजन्य निकम यांनी उपस्थित राहून सर्वांचा उत्साह वाढविला.

यावेळी बोलताना सनी निम्हण यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विक्रमी 809 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी मिळून चांगले प्रयत्न केले म्हणून सर्वांसाठी शिवराज्याभिषेक दिनी सरसेनापती हंबीरराव मोहिते या ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला.

Pune News : पालखी मार्गाच्या पाहाणीबाबत राष्ट्रवादी युवकचे आयुक्तांकडे निवेदन

यावेळी प्रविण तरडे म्हणाले की, दिवाळी दसरा इतकाच शिवराज्याभिषेक दिन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो साजरा करण्यासाठी सनी निम्हण यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन केले ही चांगली बाब आहे. समाजातील ज्या वर्गाला हा चित्रपट पाहता येणार नाही त्यांच्यासाठी असे शो आयोजित केले जावेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तो सर्वांनी पहावा असा आहे. यावेळी प्रवीण तरडे यांनी सनी निम्हण यांच्या कन्येस सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची प्रतिमा भेट देत मुलींच्या हातातील खेळणे बदला मुली खंबीर होतील असे सांगितले.

उपस्थितांनी टाळ्यांच्या (Aundh) कडकडाटात चित्रपटाचे स्वागत केले. जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने संपूर्ण चित्रपट गृह दुमदुमून गेले. एक चांगला ऐतिहासिक चित्रपट पहायला मिळाल्याने कार्यकर्ते समाधानी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.