Pune Crime News : सोने खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारी महिला अटकेत; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – सराफाला लुटणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. दत्तवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर माहीती अशी – दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदादीप ज्वेलर्स येथे दोन मे रोजी जोत्स्ना सूरज कछवाय आणि भाग्यश्री चंद्रकांत जेऊर या महिला सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. त्यांनी ५० हजार रुपयांचे गंठन चोरले होते.

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला आणि दयानंद तेलंगे पाटील यांना बातमीदाराकडून या दोन्ही महिलांविषयी माहीती मिळाली.पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक स्वप्नील लोहार व चंद्रकांत कामठे व त्यांच्या सहकारी यांनी सापळा रचून महीलांना ताब्यात घेण्यात आले. ज्योत्सना सुरज कछवाह (वय ३१,रा.अप्पर इंदीरानगर), भाग्यश्री चंद्रकांत जेऊर (वय २९, रा.कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या महीलांची नावे आहेत.

या महिलांकडे गुन्ह्याची चौकशी केली असता ज्योत्सना कछवाह हीने एक महिन्यापुर्वी नवी सांगवी येथे नंणदेसह प्रगती ज्वेलर्स येथून चोरी केल्याचे सांगितले. या चौकशी दरम्यान पोलिसांनी ५० हजार रुपयांचे सोन्याचे गंठन जप्त केले आहे. ज्योत्स्ना कछवाह ही सराईत चोर असून सोने खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या दागिने चोरल्याचे सुमारे २२ गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.