Babita Fogat’s Sister Commits Suicide : पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : भारतीय कुस्तीपटू बबीता फोगाटची  मामे बहीण रितिकाने  आत्महत्या  केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याच्या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले आहे.

या घटनेनंतर संपूर्ण क्रीडा विश्वाला मोठा धक्का लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रितिकाने 12 ते 14 मार्च दरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला. परंतु, अंतिम सामन्यात पराभव झाल्यामुळे तिने सोमवारी रात्री बलाली गावात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूर गावात राहणारी रितिका ही द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त महावीर पहलवान यांच्या बलली गावात कुस्ती अ‍ॅकॅडमीमध्ये जवळपास 5 वर्षांपासून सराव करत होती. मात्र, 53 किलो वचनाच्या गटात राज्य पातळीवर 14 मार्च रोजी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात तिचा एका अंकाने पराभव झाला. या पराभवानंतर तिला मोठा धक्का बसला. त्यानंतर 15 मार्चला रात्री 11 वाजताच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.