Talegaon Dabhade : ज्येष्ठ कार्यकर्ते हभप मारूती बाबुराव घोजगे यांचे निधन

एमपीसी न्यूज – आंबी मावळ येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते हभप मारूती बाबुराव घोजगे (वय 82) यांचे मंगळवार (दि 14) वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, दोन बहिणी, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

निस्पृह व स्पष्टवक्तेपणा हे गुण त्यांच्या अंगी होते. आंबी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य राहून ग्रामपंचायतीचा व गावकीचा कारभार ही त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळला.

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घोजगे, पांडुरंग घोजगे व समाजभूषण, हभप धोंडीभाऊ घोजगे यांचे ते ज्येष्ठ बंधू तर सर सेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब दाभाडे यांचे ते मेव्हूणे होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.