Baramati News : अडीच लाखांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या कनीष्ठ अभियंत्याला अटक

एमपीसी न्यूज – अडीच लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा (Baramati News) परिषदेच्य़ा कनीष्ट अभियंता व त्याच्या सहाय्य्काला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.9) बारामती येथील एका हॉटेलमध्ये कऱण्यात आली.

 

संदिप मारुती गोंजारी (वय 43) व खासगी इसम रणजीत प्रकाश सुर्यवंशी (वय 40) अशी एटक इसमांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव  मोबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविण्या करता गोंजारी याने 2 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपीला अडीच लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून (Baramati News) पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.