Pimpri : कासारसाई बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भाट समाजाचा कँडल मार्च

एमपीसी न्यूज – कासारसाई येथे दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भाट समाजाने कँडल मार्च केला. मुलींवर होत असलेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुलींनी घराबाहेर पडावं का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी चिंता या कँडल मार्च मध्ये व्यक्त करण्यात आली.

कसारसाई जवळ असलेल्या साखर कारखान्यात काम करणा-या लोकांनी दोन १२ वर्षांच्या मुलींवर सामूहिक बलात्कार केला. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी देखील सुनावली. यापुढील तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्व महिला असुरक्षित झाल्या आहेत. लहान मुलींना घराबाहेर खेळायला पाठवायचं का, शाळकरी मुलींना शाळेत पाठवायचं का, महिलांनी कामासाठी बाहेर पडायचं का, वृद्ध महिलांनी घराबाहेरच्या हवेचा मोकळा श्वास घ्यायचा का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

पोलीस प्रशासन काही प्रमाणात या घटनांवर अंकुश मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तरीही या घटनांच्या संख्येत वाढत होत आहे. गुन्हेगारांना कठोर शासन व्हायला हवे. अशा घटना कमी होण्यासाठी शासनाचे काहीतरी उपाय शोधावेत, असे मत भाट समाजाच्या कँडल मार्चमध्ये सर्वानी व्यक्त केले. मोर्चामध्ये शाळकरी विद्यार्थिनी देखील सहभागी झाल्या. या विद्यार्थिनींनी मी शाळेला जाऊ का? असा प्रश्न विचारणारा फलक घेऊन कासारसाई घटनेचा निषेध व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.