Bavdhan: पाच महिन्याच्या चिमुकलीचा वडिलांनीच केला खून

एमपीसी न्यूज – घरगुती वादातून वडिलानेच पाच महिन्याच्या चिमुकलीचा नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (शनिवारी) पहाटे बाधवन येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संगिता बाबुराव जाधव (वय 5 महिने, रा. बाधवन, पुणे) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बापूराव जाधव (वय 35) असे आरोपी वडिलाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी बाबुराव आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले होते. या रागातूनच त्याने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा नाकतोंड दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.