Talegaon Dabhade: लॉकडाऊन पाककला स्पर्धेत कॅरोलिना डेव्हिड प्रथम

Talegaon Dabhade: Carolina David first in lockdown cooking competition

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या 40 दिवसांच्या चार भिंतीत राहण्याने झालेल्या कोंडमाऱ्यातून आनंदाचे क्षणही मिळवता येतात. आणि हे सिद्ध करून दाखवलंय तळेगाव दाभाडे येथील बिरजूभाई किल्लावाला मित्र परिवार, आमदार सुनील शेळके फौंडेशन आणि स्वराज्य मित्र मंडळ यांच्या तर्फे आयोजित ऑनलाइन पाककला स्पर्धेनं!

याच आठवड्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कॅरोलिना डेव्हिड यांनी विजेतेपद पटकावलं. योगिता जैन, शरयू देवळे आणि शुभांगी क्षीरसागर या उपविजेत्या ठरल्या. साक्षी डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका किरण किल्लावाला यांच्यातर्फे विजेत्यांना घरपोच बक्षिसे देण्यात आली आहेत. या स्पर्धेत भाग घेतलेल्या 156 गृहिणींना आनंदाची मोठी पर्वणी मिळाली.

 पाककला स्पर्धेचा निकाल याप्रमाणे :

1. विजेत्या   कॅरोलीना डेव्हिड (बक्षीस-ओव्हन)

2. उप विजेत्या- योगिता जैन, (एअर कूलर) 

3. तृतीय क्र. शरयू देवळे, शुभांगी क्षीरसागर

4. चतुर्थ क्र. धनश्री हेंद्रे आणि स्नेहल जैन

5. पाचवा क्र. अनघा कुलकर्णी, दीपाली भोते व वैशाली शेळके

विशेष पुरस्कार

  • वैभवी हजारे
  • खुशबू शाह
  • सिद्धी गायकवाड
  • सिद्धी करंडे

या लॉकडॉऊन काळात आपण आपला ताण तणाव बाजूला ठेवून एक विरंगुळा म्हणून स्पर्धेमध्ये भाग घेतला व आम्हांस प्रोत्साहित केल्याचे बक्षिसांच्या प्रायोजक साक्षी डायग्नोस्टिकच्या संचालिका किरण किल्लावाला यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.