Bavdhan News : अभ्यासिकेतून परतत असताना रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज –   अभ्यासिकेतून परतत असताना रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एलएमडी चौक, बावधन येथील रोडवर शुक्रवारी (दि. 22) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी रिक्षा चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी खासगी अभ्यासिकेतून अभ्यास करून परत जात होती. एलएमडी चौक, बावधन येथील रोडवर आल्यावर एक रिक्षा चालक त्याठिकाणी आला. रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीकडे पाहत अश्लील हावभाव करून विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.