Chinchwad News : ॲक्सिस बॅंक मॅनेजर व गृह कर्ज विभागातील अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – अनोळखी इसमाला 74.91 लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती, ॲक्सिस बॅंक मॅनेजर, गृह कर्ज विभागातील कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 01 जानेवारी ते 20 मार्च 2021 या कालावधीत ॲक्सिस बॅंक, चिंचवड येथे ही घटना घडली.

याबाबत शिवकुमार महालिंगप्पा बेलुरे (वय 30, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील ॲक्सिस बॅंकेचे मॅनेजर, गृह कर्ज विभागातील कर्मचारी आणि प्रतिनिधी यांनी संगनमताने फिर्यादी यांची बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादीच्या नावे अनोळखी इसमाला 74 लाख 91 हजार 247 रूपयांचे कर्ज दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तापस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.