Pimpri News: विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाचा मनसेला पाठिंबा

एमपीसी न्यूज – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील कायदेशीर भोंगे उतरविण्याच्या भूमिकेला विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने पाठिंबा दिला आहे. या संघटनांनी पाठिंब्याचे लेखी पत्र मनसेचे शहर प्रभारी गणेश सातपुते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांना दिले.

शरद इनामदार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष निधी प्रमुख धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री अभिजीत शिंदे , बजरंग दल विभाग सहसंयोजक कुणाल साठे, जिल्हा सहसंयोजक सागर चव्हाण, जिल्हा सहसंयोजक युवराज पाटील, प्रखंड संयोजक संतोष देवकाते, जिल्हा गोरक्षा प्रमुख निलेश चासकर यांनी  पाठिंब्याचे पत्र दिले. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहरसचिव रुपेश पटेकर, शहरउपाध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना उपाध्यक्ष अनिता पांचाळ, भोसरी विधानसभा महिला सेना विभाग अध्यक्ष सुजाता काटे उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा तसेच ठाण्यातील उत्तर सभेनंतर त्यांच्या भूमिकेने अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश खडबडून जागा झाला असून एकवटताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या भूमिकेने प्रेरित होऊन पिंपरी – चिंचवड शहरातील विविध हिंदू संघटना प्रामुख्याने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी  मशिदीवरील कायदेशीर भोंगे उतरवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.