Bawdhan Crime News : जिन्याचा दरवाजा तोडून बावधन येथे साडेतीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज –  जिन्याचा लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी (Bawdhan Crime News) घरातील सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी बावधन येथील चंद्रसुमन बिल्डीग येथे 15 ते 16 मार्च च्या दरम्यान घडली आहे.

 

Pimpri Crime News : कोयत्याचा धाक दाखवून भाजी विक्रेत्याला लुबाडले

 

याप्रकरणी सोमवारी (दि.20) हिंजवडी पोलीस ठाण्यात चंद्रशेखर मोतीलाल परदेशी (वय 61 रा.बावधन) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या जिन्या शेजारी असलेला लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील कपाटातून 50 हजार रुपये रोख व 3 लाख रुपयांचे सोन्या चोदींचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरांचा शोध (Bawdhan Crime News) घेत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.