Pimpri Crime News : कोयत्याचा धाक दाखवून भाजी विक्रेत्याला लुबाडले

एमपीसी न्यूज –  कोयत्याचा धाक दाखवून भाजी विक्रेत्याच्या (Pimpri Crime News) गल्ल्यातून बळजबरी पैसे काढून घेण्यात आले आहेत. हा प्रकार पिंपरी भाजी मंडई येथे रविवारी (दि.19) रात्री घडली आहे.

 

Pune News : पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस

 

याप्रकऱणी आण्णा रामा अडागळे (वय 40 रा.काळेवाडी) यांनी पिपंरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हर्ष अमर बोहत उर्फ लड्या (वय18 पिंपरी) व अल्पवयीन यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील भाजी मंडईत फिर्यादी भाजी विकत असताना आरोपी तेथे आले व त्यांनी दारुसाठी फिर्यादीकडे 500 रुपयांची मागणी केली.फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता आरोपींनी शिवीगाळ करत कोत्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या गल्ल्यातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत तक्रार केली तर हात पाय तोडू अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत (Pimpri Crime News) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.