Shirur : शिवजन्मभूमीचा भगवा दिल्लीत असाच फडकत ठेवा; महेशदादांकडून डॉ. कोल्हे यांचे अभिनंदन 

राजकारणातील सुसंस्कृतपणा; आमदार महेशदादांकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिनंदन 

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी अभिनंदन केले. विरोधी उमेदवाराचे अभिनंदन करुन महेशदादांनी राजकारणातील सुसंस्कृतपणा जपला आहे. डॉ. कोल्हे यांच्या अभिनंदनाची पोस्ट महेशदादांनी फेसबुकवर शेअर केली आहे. शिवजन्मभूमीचा भगवा दिल्लीत असाच फडकत ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे निवडून आले आहेत. आढळराव यांच्यासाठी महेश लांडगे यांनी जिवाचे राण केले. भोसरीतून आढळरांवांना 37 हजारांचे लीड दिले. मात्र, पाच विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राजकारणात हार जीत असते. ते सोडून विजयी उमेदवाराचे अभिनंदन करत मनाचा मोठेपणा महेशदादांनी दाखवून दिला आहे. राजकारणातील सुसंस्कृतपणा देखील जपला आहे.

”विरोधी पक्षाचे जरी असलात तरी शिवजन्मभूमीचे प्रतिनिधित्व दिल्लीत करणार याचा सार्थ अभिमान ठेवून शिवजन्मभूमीचा भगवा दिल्लीत असाच फडकत ठेवाल हिच अपेक्षा. महाराष्ट्र आणि देशात बहूमताने भगवा फडकलाय…..गड आला पण आमचा शिरुरचा सिंह गेला….तरीही सुराज्यासाठी आम्ही सैनिक सदैव पुढे” असे आमदार महेश लांडगे यांनी डॉ. कोल्हे यांना केलेल्या अभिनंदनाच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.