Maval: ‘मावळ’मध्ये 19 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. वंचित आघाडीच्या उमेदवाराने 75 हजार 904 मते घेतली. परंतु, त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले. त्यांच्यासह 19 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले. शिवसेना-राष्ट्रवादी, वंचित बहुजन, विविध पक्ष सोडून अपक्षांनी 26 हजार 558 मते घेतली. तर, नोटाला 15 हजार 548 मते पडली. शिवसेनेचे श्रीरंग बारणे 7 लाख 20 हजार 663 मते घेऊन दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले.

‘डिपॉझिट’ वाचविण्यासाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि वैध मतांच्या 1 शष्टावंश मते पडणे आवश्यक आहे. मावळमध्ये 13 लाख 53 हजार 311 मतदान झाले होते. त्यामुळे मावळमधील डिपॉझिट वाचविण्यासाठी दोन लाख 28 हजार 143 मते पडणे आवश्यक होते. परंतु, शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार सोडून एकालाही लाखभर देखील मत पडू शकली नाहीत.

  • शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांना सात लाख 20 हजार 663 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार यांना पाच लाख 4 हजार 750 मते पडली. तर, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील यांना 75 हजार 904 मते पडली आहेत.

बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे यांना दहा हजार 197 मते पडली. क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे यांना पाच हजार 242 मते पडली. आंबेडकर राईट्‌स पार्टी ऑफ इंडियाच्या जया संजय पाटील 2 हजार 328 मते पडली. बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ नामदेव पाटील यांनी 2 हजार 570 मते घेतली. भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक यांना 1 हजार 95 मते पडली. भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील यांना 2 हजार 243 मते पडली. बहुजन रिपल्बिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड यांनी 1 हजार 746 मते घेतली.

  • त्याचबरोबर अपक्ष अजय हनुमंत लोंढे यांना 1 हजार 63 मते पडली. अमृता अभिजीत आपटे यांना 1 हजार 702, नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांना 2 हजार 821, प्रशांत गणपत देशमुख यांना 6 हजार 291, बाळकृष्ण धनाजी घरत यांना 3 हजार 600, राकेश प्रभाकर चव्हाण यांना 3 हजार 219, राजेंद्र मारुती काटे यांना 1 हजार 639, विजय हनुंमत रंदिल 2 हजार 91, सूरज अशोकराव खंडारे यांना 1 हजार 877, सुरेश श्रीपती तौर यांना 1 हजार 73 आणि डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ यांना 1 हजार 197 मते पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.