Wakad : तंबाखू खाण्यास न दिल्यावरून टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – गायछाप तंबाखू खायला न दिल्यावरून चौघांनी मिळून टपरी चालकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. तसेच, दगडफेक करून टपरीचे नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री दहाच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.

दीपक वसंत खराडे (वय 33, रा. तापकीर चौक, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वैभव कांचन आणि अनिकेत बिरंगळ (aदोघे रा. श्रीनाथ हौसिंग सोसायटी, थेरगाव) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराडे यांची तापकीर चौक येथील जय मल्हार बियर शॉपीजवळ पानटपरी आहे. शक्रवारी रात्री ते टपरीमध्ये असताना आरोपी कांचन त्या ठिकाणी आला. त्याने खराडे यांच्याकडे तंबाखू मागितली. खराडे यांनी तंबाखू नसल्याचे सांगितल्याने चिडलेल्या कांचन याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सिमेंटच्या गट्टूने दीपक यांना मारहाण केली. घाबरलेल्या खराडे यांनी टपरीचे शटर बंद केले असता आरोपींनी दगडफेक करून टपरीचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.