Chinchwad : पॉलिसीच्या बहाण्याने सव्वालाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – पॉलिसीच्या बहाण्याने एकाची 1 लाख 31 हजार 69 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2019 मध्ये घडला.

धनंजय अशोकराव जोशी (वय 39, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी जोशी यांच्या मोबाईलवर फोन केला. जोशी यांच्या मॅक्स लाईफ इंशुरन्स पॉलिसीची सर्व गोपनीय माहिती आरोपीने मिळवली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने जोशी यांच्या खात्यावरून 1 लाख 31 हजार 69 रुपये हस्तांतरित करून घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच जोशी यांनी पोलिसात धाव घेतली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.