Talegoan Dabhade : भगवान शेवकर राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज : इंदोरी मावळ येथील चैतन्य चारिटेबल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान नारायण शेवकर यांना पुण्यात राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ कृषीतज्ञ रश्मी कुमार अब्रोल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या सोहळ्यात उद्घाटक युवा उद्योजक सुशील बियाणे, तर प्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. जयश्री घोडके कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ राजाराम त्रिपाठी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विवेक क्षीरसागर,  राजेश दिवटे, नारायण देवे आदि मान्यवरांसह शैक्षणिक,सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन काव्य मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन 17 जानेवारी 2021 रोजी एस.एम. जोशी सभागृह पुणे येथे करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

 भगवान शेवकर हे एक आगळे वेगळे ध्येयाने प्रेरित असे व्यक्तिमत्व आहे, यांनी स्वबळावर इंदोरी सारख्या छोट्याशा गावात ज्ञानदानाचे रोप लावले व आता त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गावातील मुलांना आधुनिक शिक्षणाची सुविधा व नवीन तंत्रज्ञान मिळावे या उद्देशाने चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) ची स्थापना केली .मुलांना मापक फी मध्ये कोणत्याही प्रकारचे डोनेशन न  घेता ज्ञानदानाचे हे कार्य येथे अविरतपणे चालू आहे.

अत्याधुनिक सुविधा व तंत्रज्ञान प्रशिक्षित शिक्षक, सुसज्य कार्यशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष  मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण इत्यादी सर्व सुविधांनी सुसज्ज प्रशस्त वर्ग खोल्या, गुणवत्ता पूर्ण अभ्यासक्रम  व विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम येथे राबवले जातात या कार्याची दखल घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील ELDROK India K – 12 Award 2020 शाळेला मिळाले आहे.

शैक्षणिक वर्ष 2021 – 22 पासून ज्युनिअर कॉलेज सायन्स कॉमर्स कॉलेज सुरू होत आहे. मा. भगवान नारायण शेवकर यांचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास फार खडतर होता पण कोणत्याही परिस्थितीत न डगमगता या सर्वांना नवचेतना व प्रेरित करणाऱ्या या व्यक्ती महत्त्वाचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.