Pune News: धम्म प्रचार रॅली काढून साजरी केली आंबेडकर जयंती

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पुण्यात सुद्धा अगदी मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली. धम्म प्रचार रॅली काढून सर्व भीम सैनिकांनी यंदाची भीम जयंती साजरी केली.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात येत असल्याने आंबेडरी अनुयायांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पुण्यात सुद्धा अगदी मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली.

पुण्यातल्या साई द्वारिका येवलेवाडी मित्र परिवार यांच्या वतीने ही धम्म प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. निळ्या गुलालाची उधळण करीत ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आजुबाजुचा परिसर दणाणून सोडला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या धम्म प्रचार रॅलीला सुरूवात केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. त्यानंतर त्रिशरण पंचशीलाने या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी राहुल बोराडे, नवनीत अहिरे, अजय कोकाटे, गौतम पायाळे व राजकुमार धिवार, सुनिल कांबळे यांच्या पुढाकाराने ही धम्म प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.