Bhosari : गहाळ झालेले 30 मोबाईल मूळ मालकांना परत

एमआयडीसी भोसरी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध (Bhosari ) घेऊन 30 मोबाईल फोन ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नागरिकांनी त्यांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत तक्रार नोंदवली होती. याबाबत पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला.

PCMC : यापुढे रस्ते खोदकाम केल्यास कारवाई

30 मोबाईल फोन शोधण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले. तसेच चोरीच्या दोन गुन्ह्यातील 20 ग्रॅम वजनाचे दागिने देखील मूळ मालकांना परत करण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकूण चार लाख 85 हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार अनिल जोशी, चंद्रकांत गवारी, स्वप्निल शेलार, संजय जरे, गणेश बोऱ्हाडे, राहुल लोखंडे, शरद गांधीले, भागवत शेप, नितीन खेसे, विशाल काळे, अनिकेत कांबळे, उषा होले यांनी (Bhosari ) केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.