Bhosari : मास्टर माईंड ग्लोबल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा 7 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

एमपीसी न्यूज : मास्टर माईंड ग्लोबल स्कूल (Bhosari) आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा 7 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पार पडला. मंत्रमुग्ध करणाऱ्या 5 सत्रांमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला. ’70 MM लाइट कॅमेरा ॲक्शन’ या थीम अंतर्गत भोसरी येथील ‘संत तुकाराम बँक्वेट्स’ हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक विभागासाठी वीणा नटराज यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पीके ग्रुपचे संचालक सोमनाथ काटे, एम.एम.जी.एस.च्या सेक्रेटरी जयश्री गवळी यांच्यासह प्रशासक मणिकंदन नायर यांना माध्यमिक विभागासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्राथमिक विभागासाठी आसमा मोमीन प्रमुख पाहुण्या होत्या.

Ajit pawar: पाणीबचतीच्या उपाययोजना करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पूर्व प्राथमिक ते नववी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बॉलीवूडचे वेगवेगळे युग सादर केले. यामध्ये त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित तारकांना आदरांजली (Bhosari) वाहिली. शोले ड्रामा, तानाजी यांसारखे अभिनय आणि संगीतमय गायनाचा कार्यक्रम अशा अनेक खास कलाकृती सादर करण्यात आल्या. ज्यांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. प्रदीपा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली MMGS चे 2500 हून अधिक विद्यार्थी आणि 115 शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.