Bhosari : उधार देण्यास नकार दिल्याने भाजीविक्रेत्या महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज – उधार देण्यास नकार दिल्याने भाजी विक्रेत्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.29) रात्री आठच्या सुमारास टेल्को रोड, भोसरी येथे घडली.

सावित्री बन्सी शिंदे (वय 57, रा. बालाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू मनोहर पवार (वय 38, रा. बालाजीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिंदे यांची भोसरी येथील टेल्को रोडवर भाजीची टपरी आहे. रविवारी रात्री आरोपी पवार त्यांच्या टपरीवर आला. त्याने उधारीवर पान आणि सुपारी मागितली. मात्र, उधार देण्यास शिंदे यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पवार याने त्यांना लाकडी फळीने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.