Vadgaon Maval : मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघातर्फे गुरुवारी ग्रामीण कारागीर मेळावा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि. २ जानेवारी) ग्रामीण कारागीर मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती अध्यक्ष अंकुश आंबेकर यांनी दिली.

येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी 11.30 वाजता या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात संघाचे जिल्ह्याचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.तरी, ग्रामीण भागातील कारागिरांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संघाच्या वतीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.