BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : मोटारीला धक्का लागल्याच्या रागातून तरुणीची दुचाकी पळवली

313
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- मोटारीला धक्का लागल्याच्या रागातून तरुणीची मोटार पळवून नेली. मंगळवारी (दि. 23) दुपारी पावणेचारच्या सुमारास आळंदी रोड येथील शास्त्री चौकात ही घटना घडली.

या प्रकरणी स्वरदा किशोर मिठबावकर (27, रा. सहयोग सोसायटी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरदा या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा आरोपीच्या कारला धक्का लागला. आरोपीने स्वरदा यांच्याकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावर स्वरदा यांनी पैसे नसल्याचे सांगून कोणाकडून तरी मागवून पैसे देण्याचे त्यांनी मान्य केले. दरम्यान आरोपींनी आपसात संगनमत करून स्वरदा याना शिवीगाळ तसेच दमदाटी करीत त्यांची दुचाकी पळवून नेली.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3