Bhosari : चक्रपाणी वसाहत येथे उघड्या दरवाजावाटे चोरी

एमपीसी न्यूज – चक्रपाणी वसाहत भोसरी येथे चोरट्यांनी ( Bhosari ) उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली.

Hinjawadi : टास्कच्या बहाण्याने पावणे सात लाखांची फसवणूक

प्रताप ज्ञानोबा म्हेत्रे (वय 26, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 80 हजार रुपयांचा लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. भोसरी पोलीस ( Bhosari ) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.