Hinjawadi : टास्कच्या बहाण्याने पावणे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची (Hinjawadi) सहा लाख 75 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 30 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

Hari Narke : प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त

याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार www.5ocyatm.top या संकेतस्थळावरील अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी टेलिग्रामवर संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास फायदा होईल, असे आमिष दाखवले.

त्यानुसार आरोपीने फिर्यादीकडून सहा लाख 75 हजार रुपये घेऊन (Hinjawadi) फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.