Bhosari : भोसरीकरांच्या पाठिंब्यामुळे ‘चौकार’ मारणारच- शिवाजीराव आढळराव-पाटील

‘दादांच्या’ मनोमिलनामुळे भोसरीत शिवसेनेच्या प्रचार फेरीत उर्त्स्फुत प्रतिसाद; शिरुरच्या सर्वांगिण विकासासाठी युतीच्या उमेदवाराचा विजय आवश्यक -आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेतील मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच माझी ‘हॅट्रीक’ झाली. आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांच्या सहका-यांमुळे ‘चौकार’ मारणारच, असा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभेचे भाजप, सेना, रासप, महासंग्राम महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 4) भोसरी गावठाण व परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. भोसरीतील बापूजी बुवा मंदिर, भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर या परिसरात महिला भगिनींनी उमेदवार खासदार आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांचे पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.

  • ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. मारुती मंदिर जवळ पत्रकारांशी खासदार आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांनी संवाद साधला. यावेळी लांडगे म्हणाले की, केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत. अशी बहुतांशी भारतीयांची इच्छा आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास आगामी काळात वेगाने होण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुरमधून युतीचे उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे. यासाठी मी आणि माझे सर्व नगरसेवक, नगरसेविका व सहकारी प्रचारात आघाडी घेत आहोत.

यावेळी खासदार आढळराव पाटील, आमदार महेशदादा लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे, पक्षनेते एकनाथ पवार, उमा खापरे, शैला मोळक, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे, महादेव गव्हाणे, दत्तात्रय गायकवाड, युवा नेते सचिन भैया लांडगे, सोनाली गव्हाणे, स्विनल म्हेत्रे, भिमाताई फुगे, प्रियांका बारसे, कमलताई घोलप, अरुणा भालेकर, अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, साधना मळेकर, सुवर्णा बुर्डे, नम्रता लोंढे, साधना तापकीर, रुपाली आल्हाट, साधना मळेकर, हिरानानी घुले, निर्मला गायकवाड, ॲड. नितीन लांडगे, सागर हिंगणे, गोपीकृष्ण धावडे, संतोष लोंढे, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, सुरज लांडगे, शैलेश मोरे, परशुराम आल्हाट, नंदकुमार दाभाडे, मंगेश हिंगणे, सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, वसंत बोराटे, संतोष मोरे, लक्ष्मण सस्ते, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, दिनेश यादव, विनायक मोरे, अजित बुर्डे, उत्तम केंदळे, दीपक मोढवे, पांडूरंग साने, पांडूरंग गवळी, अभिमन्यु लांडगे, तसेच भाजप सेनेचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.