Bhosari Crime News : चालत्या रिक्षातून पडल्याने पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – लहान मुलींना रिक्षातून चक्कर मारणे एका रिक्षा चालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. रिक्षातून चक्कर मारताना एक मुलगी चालत्या रिक्षातून रस्त्यावर पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.

सुदर्शन ग्यानोबा भालेराव (वय 34, रा चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अमोल अशोक जावळे (वय 32, रा. फुलेनगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिव्या (वय 5) असे जखमी मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, सुदर्शन हा रिक्षा चालक आहे. आरोपी रिक्षा चालक मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास परिसरात लहान मुलांना रिक्षातून चक्कर मारत होता. त्यावेळी त्याने भरधाव वेगात रिक्षा चालवली. त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी दिव्या चालत्या रिक्षातून खाली पडली. त्यात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.