Bhosari : मुलांना गोंधळ घालण्यास मज्जाव केल्यावरून पती-पत्नीस मारहाण

एमपीसी न्यूज – घराच्या शेजारी खेळणा-या मुलांना गोंधळ करू नका म्हणाल्यावरून सात जणांनी मिळून पती-पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री अकराच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे घडली.

सोनी राजेश कनोजिया (वय 29, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नील टिंगरे आणि अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी लांडेवाडी मधील विकास कॉलनी नंबर चारमध्ये राहतात. सोमवारी त्यांच्या घराशेजारी मुले गोंधळ घालत होती. त्यामुळे त्या मुलांना गोंधळ घालू नका म्हणाल्या. यावरून स्वप्नील टिंगरे, त्याची आई, वडील आणि अन्य चौघांनी मिळून सोनी यांच्या घराचा दरवाजा लाथा मारून उघडला.

आरोपींनी सोनी आणि त्यांच्या पतीला मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने घरासमोरील झाडांच्या कुंड्या फोडल्या. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.