Bhosari: पूर्व वैमनस्यातून एकाला दांडक्याने मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्व वैमनस्यातून दोघांनी मिळून एकाला लाकडी दांडक्याने डोक्यावर, हातावर बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता भोसरीतील इंद्रलोक कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी भूषण बहिरट (वय-19), बालाजी घाडगे (वय19, दोघेही रा. इंद्रलोक कॉलनी, पांजरपोळ, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीपाद विश्वनाथ देवकर (वय 19, रा. इंद्रलोक कॉलनी, पांजरपोळ, भोसरी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. हा वाद मिटवतो, असे फिर्यादीचा मित्र छोटू यादवला आरोपी बालाजीने फोन करून सांगितले होते. परंतू, आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने पाठीवर, डोक्यावर, हातावर मारून गंभीर जखमी केले. भोसरी, एमआयडीसी पोलीस याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.