Bhosari : भोसरीतील विजेचा लंपडाव संपणार, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु

धोकादायक ट्रान्सफॉर्मर हटविले, आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज- पिंपरी महापालिकेत समाविष्ट झालेल्या भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावातील विजेचा लपंडाव संपणार आहे. च-होली, वडमुखवाडी, मोशीसह भोसरी मतदारसंघात आवश्यकतेनुसार महावितरणने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होणार नाही. तसेच धोकादायक ट्रान्सफॉर्मर महावितरणे हटवल्यामुळे संभाव्य धोका टाळला आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

महावितरण विभागामार्फत भोसरी मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले होते. वीजपुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी विशेष प्रयत्न करत जिल्हा नियोजन समिती व प्रणाली बळकटीकरण योजने मधून निधी मंजूर करुन घेतला.

त्यानुसार भगतवस्ती येथे 630 केवी एचे नवीन ट्रान्सफॉर्मर ज्यादा क्षमतेचा, सेक्टर 10 एमआयडीसी भोसरी येथे सद्यस्थितीतील ट्रान्सफॉर्मरवर जादा क्षमतेचा 315 केवी ए, साई मंदिर वडमुखवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. च-होली बैलघाट येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झालेला आहे. तसेच कोतवालवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर 630 केवी मंजूर झाला असून काम चालू करण्यात येणार आहे. च-होली स्मशानभूमी येथे नागरिकांच्या मागणीनुसार नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे.

तसेच सेक्टर 6 मोशी प्राधिकरण येथे तीनशे वीस मीटर लांबीची केबल नसल्यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले होते. केबल उपलब्ध करून दिली आहे. तसेच गायकवाड वस्ती मोशी याठिकाणी वीज खंडीत होण्याचे प्रमाण असून सदर ठिकाणी केबल महावितरण कार्यालय प्राप्त होताच केबल टाकून प्रश्न सोडवला जाणार आहे. मोशी आल्हाट वस्ती येथे रहदारीच्या ठिकाणी अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मरही स्थलांतरित करण्यात आला आहे.

त्याचबरोबर काळी भिंत च-होली याठिकाणी अस्तित्वात असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची मागणी शेतकर्‍यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार हा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.