Bhosari : कामगारांच्या उत्कर्षासाठी पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे यांचे नेतृत्व हवे; कामगार नेते जीवन येळवंडे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांनी कामगारांच्या हितासाठी अनेकवेळा वेगवेगळ्या स्तरावर आवाज उठवला आहे. त्यांचे प्रश्न समजून त्यावर सक्रियपणे काम केले आहे. पूर्णवेळ कामाची संधी, वेतन निश्चिती, सुरक्षा साहित्याचे वाटप आणि असे अनेक उपक्रम आमदार माहेश लांडगे यांनी राबविले आहेत. त्यामुळे कामगारांच्या उत्कर्षासाठी आमदार म्हणून महेश लांडगे हेच निवडून यायला हवेत, असे मत स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते जीवन येळवंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी जीवन येळवंडे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची ‘कामगारनगरी’ अशी ओळख आहे. उद्योगधंद्यांचे शहर असल्यामुळे कामगारांची वस्ती मोठी आहे. भूमिपूत्र असलेले अनेक नागरिक कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे कामागारांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम पुढाकार घेतला आहे. औद्योगिक पट्टयातील 43 कंपन्यांमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून काम करणार्‍या 10 हजार 800 पेक्षा जास्त कामगारांसोबत आमदार महेश लांडगे काम करीत आहेत.

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, शिव गर्जना कामगार संघटना आदींच्या माध्यमातून कामगारांच्या हक्काचा व उत्कर्षाचा लढा अविरत सुरू आहे. महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीत सुमारे 450 कामगार काम करत होते. त्यातील केवळ 50 कामगारांना परमनंट नोकरी मिळाली होती. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून 402 कामगारांना पूर्णवेळ नोकरी मिळाली आहे. पीएमपीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी नवीन दराप्रमाणे वेतननिश्चिती करण्यात आली आहे.

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबवले जात आहेत. कामगार विमा रुग्णालयाच्या मागणीसाठी आमदार महेश लांडगे यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली. गुणवंत कामगारांचा गौरव सोहळा केला. बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले. या कामगार कल्याणकारी उपक्रमांमुळे पुढील काळातही आमदार महेश लांडगे यांचेच नेतृत्व हवे आहे. असेही जीवन येळवंडे म्हणाले.

व्हिडिओ :-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.