Bhosari: पूरग्रस्तांसाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. यापूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हाती घेतला आहे. पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात येणार आहे.

महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन, अविरत श्रमदान, सांकोसा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच आदी सामाजिक संस्था संघटनांनी यासाठी सहकार्य केले आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. त्याद्वारे पन्नास वाहनांमध्ये बसेल एवढे अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनोपयोगी साहित्य कोल्हापूर, सांगली तसेच कराड भागातील पुरग्रस्तांना दिले जाणार आहे.

  • कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना सध्या मदतीची गरज आहे. त्यांचे काही नातेवाईक, मित्र परिवार पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरात वास्तव्यास आहेत. अनेकांना गावाकडील लोकांना कशी मदत करावी याची चिंता आहे. अशा नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, सामाजिक बांधिलकीतून मदत देण्यासाठी संदीप ठाणेकर : ९७६५६४९७९७, डॉ. निलेश लोंढे : ९८८ १५७२३९५, दिगंबर जोशी : ९०११०१२९७४, जितेंद्र माळी : ९८९०९२६९९७ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आर्थिक स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही. आर्थिक मदत करायची असेल, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी येथे करावी, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

  • आपत्ती व्यवस्थापन फेडरेशन, पुणे आणि आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस फाउंडेशनच्या माध्यमातून ‘एनडीआरएफ’ प्रशिक्षण प्रशिक्षित पथक सांगलीतील पूरग्रस्त गावांतील नागरिकांच्या मदतीसाठी रवाना झाले आहे. एकूण 25 जणांचे पथक असून, अध्ययावत बोट, रबर बोट, लाईफ जाकेट, जेवनाचे साहित्य यासह आवश्यक साहित्य घेवून संबंधित टीम सांगलीकडे रवाना झाली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.