Bhosari News: सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाकडून अटक

आरोपीने भोसरी परिसरात मागील वर्षी सशस्त्र दरोड्याच्या गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी-दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.11) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

जाकीर कय्युम पठाण (वय 20, रा. जुनी चाळ, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाने पोलीस निगडी परिसरात गस्त घालत होते. चिकन चौक, ओटास्कीम, निगडी येथे पोलीस नाईक निशांत काळे आणि पोलीस शिपाई राजेश कौशल्ये यांना माहिती मिळाली की, भोसरी पोलीस ठाण्यात मागील वर्षी दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी जाकीर पठाण हा चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे थांबला आहे.

त्यानुसार, पोलिसांनी थरमॅक्स चौकात सापळा लावला. जाकीर पठाण चौकात कुणाची तरी वाट पाहत थांबला होता. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने भोसरी परिसरात मागील वर्षी सशस्त्र दरोड्याच्या गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.