Bhosari News : ‘इंद्रायणी थडी’ मध्ये तरुणांना रोजगाराची संधी

एमपीसी न्यूज – महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतुने आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी- 2023’ महोत्सवात यावर्षी तरुणांना नोकरीची( Bhosari News)संधीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शिवांजली संखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘इंद्रायणी थडी- 2023’ हा महोत्सव  25 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 दरम्यान भोसरी येथील गावजत्रा मैदानात होणार आहे. तब्बल 17 एकर जागेत महाराष्ट्रभरातून 1 हजार स्टॉल उभारण्यात आले आहेत.

महोत्सवामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्राम संस्कृती, खाद्य महोत्सव, बाल जत्रा, परंपरिक खेळ, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, पाटील वाडा प्रतिकृती, भजन महोत्सव, मर्दानी खेळ, विविध भागातील कलाकृती आणि हस्तकला प्रदर्शन, खेळ रंगला पैठणीचा, मंगळगौर खेळ यासह फॅशन शो, महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, सिनेतारका नृत्य, पारंपरिक नृत्य, जादूचे प्रयोग, झुंबा डान्स अशा विविध कार्यक्रम( Bhosari News) एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

Chinchwad Bye Election: राष्ट्रवादीने पोटनिवडणूक लढवावी ,शहर पदाधिका-यांचे शरद पवार यांना साकडे

यासह आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आणि बेरोजगार तरुणांना संधी देण्यासाठी नोकरी महोत्सवसुद्धा होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने नियोजन केले आहे.

तब्बल 3 हजार 351 पदांसाठी मेळावा

यावर्षी तरुणांना रोजगाराची संधी या अनुषंगाने रोजगार मेळावासुद्धा आयोजित केला आहे. त्यासाठी त्यासाठी महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये खासगी आस्थापनेतील तब्बल 3 हजार 351 इतक्या पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी 23 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचे स्टॉल याठिकाणी उपलब्ध केले आहेत. इयत्ता 10 वी ते पदवीधर तसेच ( Bhosari News) आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या सर्व उमेदवारांनी रोजगार मेळ्याव्यास येताना शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे व बायोडाटा या सर्व प्रती सोबत घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अधिक माहितीसाठी 9689866804/7972965226 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.