Alandi News : राष्ट्रीय चालक एकता महामंचाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले

एमपीसी न्यूज- देशभरातील ऑटो रिक्षा,टॅक्सी ,बस,टेम्पो,ट्रक यासह  वाहतूकदार संघटना असणाऱ्या राष्ट्रीय चालक एकता महामंचाचे राष्ट्रीय अधिवेशन आज (21 जानेवारी) आळंदीतील हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत (Alandi News)पार पडले.

देशभरातील बावीस करोड पेक्षा अधिक वाहन चालक मालकांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आयोग गठीत करावा,शहीद झालेल्या ड्रायव्हर साठी देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक बनवावे,देशभरातील स्थानिक पातळीवरील विविध मागण्यांवर या राष्ट्रीय अधिवेशना मध्ये चर्चा झाली.

Bhosari News : ‘इंद्रायणी थडी’ मध्ये तरुणांना रोजगाराची संधी

तसेच अनेक मान्यवरांचे येथे सन्मान करण्यात आले.या अधिवेशनात राजस्थान, आंध्र प्रदेश अश्या विविध राज्यातील व शहरातील वाहतूक संघटना उपस्थित होत्या. तसेच यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर रिक्षा पंचायत ब्रिगेड शहराध्यक्षपदी संतोष  गुंड यांची (Alandi News)नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे,बाळासाहेब ढवळे, जालिंदर गवारे,माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक सागर भोसले,राष्ट्रवादी नेते डी डी भोसले,राष्ट्रवादी नेते प्रकाश कुऱ्हाडे, मल्हार काळे,अर्चना घुंडरे, राहुल कुऱ्हाडे,गुलाबभाई सय्यद,विलास कामसे,चेतन राऊत,संजय शिंदे व संघटनेचे विविध मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.