Bhosari News : ‘या’ फरार सराईत चोरट्याला शोधताहेत पोलीस, वारंवार बदलतो सिम

एमपीसी न्यूज : फरार घोषित असलेल्या एका सराईत चोरट्याला पोलीस शोधत आहेत. हा चोरटा अत्यंत करामती आणि शातीर असून तो वारंवार सिमकार्ड व मोबाईल फोन बदलतो. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नाशिक, चाकण परिसरात एकूण तीस गुन्हे दाखल आहेत.

ओम उर्फ पप्पू बाळकृष्ण सातपुते (वय 34) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. तो मुळचा तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील रहिवासी आहे. सध्या कैलास भोसकर बिल्डिंगच्या जवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे राहतो. भोसरीत चप्पल दुकान अथवा भाजीपाला गाडी लावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

न्यायालयात सुनावणीकामी हजर राहत नसल्याने मुलुंड न्यायालयाने त्याला 11 सप्टेंबर 2018 रोजी फरार घोषित केले आहे. आरोपी चोऱ्या करण्यात सराईत असून सध्या भोसरीत राहत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे हा सराईत चोरटा कुणाच्या निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : पीएसआय महेश लामखडे (मो. क्र. 9923896389), पोलीस हवालदार राजेंद्र खैरनार, (मो. क्र. 9769418004).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.