Bhosari News: पतीला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

आरोपीने पीडित महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिला भोसरी, चिखली, चिंचवड आणि आळंदी परिसरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

एमपीसी न्यूज – पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तरुणाने एका महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील फोटो काढून ते पतीला दाखवण्याची धमकी देत लाखो रुपये घेतले. त्यानंतर ही बाब पतीला सांगून विवाहितेची बदनामी केली. हा प्रकार 17 मार्च 2017 पासून 7 जुलै 2020 या कालावधीत भोसरी, चिखली, चिंचवड आणि आळंदी परिसरात घडला आहे.

राजू रूपसिंग चव्हाण (वय 25, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिला भोसरी, चिखली, चिंचवड आणि आळंदी परिसरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिलेचे अश्लील फोटो काढले. ते फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देऊन तिच्याकडून लाखो रुपये घेतले.

पैसे परत न देता महिलेच्या पतीला हा सर्व प्रकार सांगून तिची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.