Bhosari : दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एकाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील दुचाकी (Bhosari) दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) मध्यरात्री स्पाइन सर्कल, स्पाइन रोड, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

गोपाळ सिंह (वय 30 रा. बालाजीनगर, भोसरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहेत. शिवा कुमार (वय 22) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ सिंह व शिवा कुमार हे दोघेजण एका दुचाकीवरून चालले होते. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ते स्पाइन रोड सर्कल येथे आले. त्यावेळी त्यांची दुचाकी घसरून दुभाजकाला धडकली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल केले.

Maharashtra News : राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

मात्र उपचारापूर्वीच गोपाळ सिंह यांचा मृत्यू झाला. तर (Bhosari) शिवा कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.