Wakad : इमारतीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीवरून (Wakad ) पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. 6) सकाळी घडली. विजय रंगनाथ हंडीबाग (वय 21, रा. शिवशंकर हाऊसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडीबाग हे बुधवारी सकाळी डांगे चौक, येथील हाय लाइफ टॉवर येथील इमारतीमध्ये कामानिमित्त गेले होते.

मोबाइल फोनवर बोलत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. ज्यावेळी ते खाली पडले त्यावेळी ते फोनवर बोलत होते. मात्र मोबाईलचा डिस्प्ले फुटल्याने ते कोणाशी बोल होते ते समजू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर मागविण्यात आला आहे.

Bhosari : दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एकाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

तसेच ज्या ठिकाणावरून ते खाली पडले तिथे कठडे आहेत. त्यामुळे हा अपघात (Wakad ) आहे की आत्महत्या आहे याबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.